इतिहास[संपादन]

रशियन साम्राज्य[संपादन]

इतिहास[संपादन]

रशियन साम्राज्य[संपादन]

मुख्य लेख: रशियन साम्राज्य

पीटर द ग्रेट

इ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.
पीटर द ग्रेट ची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले.
कॅथेरिन दुसरी किंवा “महान कॅथेरिन” हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

Leave a comment